डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण, मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

डिसेंबरपर्यंत पावसाचे वातावरण, मराठवाडा आणि कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या दीर्घकालीन अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा मान्सूनोत्तर काळातही (ऑक्टोबर ते डिसेंबर) पावसाळी वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

ला नीना (La Nina) आणि जास्त पावसाची शक्यता

येत्या काळात ‘ला नीना’ स्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे, जी मान्सूनोत्तर काळातही पोषक मानली जाते. सध्या ‘ला नीना’चा निर्देशांक ०.४ ते ०.८ अंश सेल्सियस इतका असून, तो डिसेंबर २०२५ पर्यंत विकसित होण्याची शक्यता आहे. ‘ला नीना’ सक्रिय झाल्यास मान्सूनोत्तर काळात पावसाचा प्रभाव जास्त राहू शकतो, ज्यामुळे महाराष्ट्रात डिसेंबरपर्यंत पाऊस मुक्कामी असणार आहे.

सरासरीपेक्षा २० टक्के जास्त पाऊस

संपूर्ण देशात मान्सून काळात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. मराठवाडा विभागात सरासरीपेक्षा सर्वाधिक ६९ टक्के जास्त पाऊस झाला, तर कोकणात ३५ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात २६ टक्के जास्त पाऊस झाला आहे. मराठवाड्यातील लातूर, नांदेड, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि कोकणातील पालघर या जिल्ह्यांमध्ये या काळात जोरदार पाऊस झाला आहे. केवळ विदर्भात सरासरीपेक्षा २० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

प्रमुख जिल्ह्यांतील पावसाची स्थिती

राज्यातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये झालेला पाऊस (जून ते २० सप्टेंबर २०२५) खालीलप्रमाणे आहे:

विभाग जिल्हा पावसाची नोंद (मिमी,

1) मराठवाडा | बीड | ९९७.५ मिमी |
2) नांदेड | १११७.५ मिमी |
3) धाराशिव | ११२५.८ मिमी |
4) परभणी | ११६२.२ मिमी |
5) कोकण | ठाणे | १३९१.४ मिमी |
6, रत्नागिरी | १३४४.५ मिमी |
7, मध्य महाराष्ट्र | पुणे | ८६५.४ मिमी |
8, कोल्हापूर | ८४४.२ मिमी |

या दीर्घकालीन हवामान अंदाजामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनीही पुढील तीन महिन्यांसाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.

Leave a Comment