अतिवृष्टी बाधित ; तालुका निहाय मदतीच्या याद्या जाहीर
अतिवृष्टी बाधित ; राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केल्यानंतर, गुरुवारी (९ ऑक्टोबर) बाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या शासन आदेशानुसार, शेती पिके, जमीन, पशुधन आणि घरांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या (NDRF) निकषांनुसार मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुटपुंजी मदत मिळाल्याने निराशा:
जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, ३१ जिल्ह्यांतील २५३ तालुक्यांतील शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त केवळ हेक्टरी ₹१०,००० इतकीच अधिकची मदत मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मदतीचे स्वरूप आणि मर्यादा:
राज्य सरकारने सरसकट मदत देण्याचे आश्वासन दिले असले तरी, शासन निर्णयात शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एनडीआरएफचे निकष कायम ठेवण्यात आले आहेत:
1) कोरडवाहू पिके: प्रति हेक्टर ₹८,५००
2) बागायत पिके: प्रति हेक्टर ₹१७,००
3) बहुवार्षिक पिके: प्रति हेक्टर ₹२२,५००
ही मदत ३ हेक्टरच्या मर्यादेत दिली जाणार आहे. यामध्ये रब्बी हंगामासाठी निविष्ठा अनुदान स्वरूपात प्रति हेक्टरी ₹१०,००० (३ हेक्टरच्या मर्यादेत) अतिरिक्त दिले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील अतिवृष्टी आणि पूर बाधित शेतकऱ्यांना अत्यंत तुटपुंजी मदत मिळणार असल्यामुळे तीव्र नाराजी पसरली आहे.
मदतीच्या यादीतून नांदेड जिल्हा वगळला:
शासन निर्णयात अतिवृष्टी आणि पूरबाधित तालुक्यांची यादी प्रसिद्ध केली असली तरी, त्यात नांदेड जिल्ह्याचा समावेश वगळण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने मोठे नुकसान होऊनही जिल्ह्याला यादीतून वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आणि संताप निर्माण झाला आहे. तसेच, इतरही काही महत्त्वाचे बाधित तालुके वगळण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
कोणत्या तालुक्यातील किती मदत खालील प्रमाणे पहा.
